Breaking News

ठाकरे सरकारला दणका!

कांजूरमार्ग मेट्रोशेडचे काम तत्काळ थांबवविण्याचे हायकोर्टाचे निर्देश

मुंबई ः प्रतिनिधी
मुंबई मेट्रो-3च्या कारशेडसाठी कांजूरमार्गमधील 102 एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाने बुधवारी (दि. 16) स्थगिती दिली आहे. त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास एमएमआरडीएला मनाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय फेब्रुवारी महिन्यात दिला जाईल, असेही हायकोर्टाने सांगितले. परिणामी मेट्रोचे कारशेड ’आरे’तून हलवून कांजूरमार्ग येथे कामाची सुरुवात करणार्‍या राज्य सरकारसाठी हा मोठा दणका मानला जात आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेडसाठी आरेऐवजी कांजूर येथील जागा निश्चित केली होती, मात्र हा निर्णय वादाच्या भोवर्‍यात अडकला. केंद्र सरकारने ही जमीन केंद्राच्या मालकीची असल्याचा दावा करीत न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांच्या जमीन हस्तांतरणाच्या आदेशात त्रुटी असल्याचे नमूद केले होते, तरीही राज्य सरकार आपला हेका सोडण्यास तयार नव्हते.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply