Breaking News

सायन-पनवेल महामार्गावर विचित्र अपघात

30 वाहने एकमेकांवर आदळली

मुंबई : प्रतिनिधी
सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली उड्डाणपुलावर बुधवारी (दि. 30) सकाळी विचित्र अपघात झाला. या वेळी 30 वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही.
सायन-पनवेल महामार्गावर बुधवारी सकाळी 10.15च्या सुमारास दोन विचित्र अपघात झाले. पहिल्या अपघातात एका वाहनचालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे 22 वाहने एकमेकांवर आदळली, तर दुसर्‍या अपघातात सात वाहनांची धडक झाली.
सायन-पनवेल महामार्गावर काँक्रिट रस्त्यावरील भेगांमध्ये डांबर भरण्याचे काम केले जात होते. या वेळी कळंबोली उड्डाणपुल चढून गाड्या भरधाव वेगात खाली उतरत असताना वाहनांना ब्रेक दाबावा लागला. त्यामुळे हे अपघात झाल्याचे काही वाहनचालकांनी सांगितले.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply