Breaking News

राज्यात महिलामध्ये असुरक्षिततेची भावना

भाजप नेत्या सुल्ताना खान यांची राज्य सरकारवर टीका

पेण : प्रतिनिधी

पेणमधील लहान बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपुर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून सरत्या वर्षाअखेरीस  या आठवड्यात औरंगाबाद, लातूर व आता पेणची घटना अशा लागोपाठ घडलेल्या तीन घटनांमुळे राज्यात महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असुन गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याचा धाक राहिला नसल्याची घणाघाती टीका भाजप महिला अल्पसंख्यांक मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षा सुल्ताना खान यांनी राज्य सरकारवर केली.

पेण येथील पीडित कुटुंबीयांच्या भेटीप्रसंगी सुल्ताना खान यांच्यासोबत आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्षा प्रितम पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, महिला व बालकल्याण समिती सभापती तेजस्विनी नेने, नगरसेविका शहनाज मुजावर,भाजप जिल्हा चिटणीस बंड्या खंडागळे, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, नगरसेविका अश्विनी शहा, रवींद्र म्हात्रे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलताना सुल्ताना खान यांनी सांगितले कि,  महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार ठोस पावले उचलत नसल्याने वारंवार अशा घटना घडत असून अशा घटनांना रखण्यासाठी सरकारने आणखी कडक धोरण अवलंबवावे अशी मागणी आम्ही करीत आहोत. या बाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणवीस यांच्याकडे याबाबत चर्चा करणार असून कठोर कायद्याची अंमलबाजवणी होणे गरजेचे असल्याचे शेवटी सुल्ताना खान यांनी सांगितले.

 या वेळी आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले कि, पीडित कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी व विशेष मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून आरोपीस कडक शासन व्हावे, अशी मागणी सरकारकडे करणार आहोत. तसेच पेणमध्ये अमली पदार्थ बाळगणार्‍यावर कठोरात कठोर कारवाई पोलिसांनी करावी.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply