Breaking News

पोलीस आणि व्यापार्‍यांकडून वृद्धाश्रमास वस्तूंचे किट वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे. यातच रसायनी पोलिसांनी एक हात मदतीचा पुढे करत व्यापारी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वृध्द नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी व स्वच्छता या दृष्टीने आरोग्यास उपयुक्त अशा वस्तूंच्या किटचे वाटप केले. वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीतील तळेगाववाडी येथील मानव आशा सेवा होम संचलित वृध्दाश्रमाला भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत येथील वृध्द नागरिकांची विचारपूस पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी केली. त्यांना धीर देऊन प्रतिकारशक्ती वाढावी व स्वच्छता यादृष्टीने च्यवनप्राश, नायसिल पावडर, विक्स बॉटल, मास्क, खजूर, मणुके, सॅनिटायझर आदी वस्तूंच्या किटचे वाटप पोलीस व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन केल्याचे दिसून आले. वृध्दांना भेटवस्तूंचे किट वाटप केल्याने त्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले. वाटपाच्या वेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, पोलीस मंगेश लांगी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज सोमाणी, सचिव अमित शहा, सचिन मालकर, सतीश ओसवाल, विलास ओसवाल आदी उपस्थित होते.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply