पेण ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळातर्फे इंधनाची बचत मोहिमेला सुरुवात झाली असून 16 फेब्रुवारीपर्यंत महिनाभर ही मोहीम सबंध राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने रायगड विभागातील पेण आगारात इंधन बचत मोहिमेचा शुभारंभ विभागीय नियंत्रक अधिकारी अनघा बारटक्के यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या वेळी रायगड विभागातील अधिकारी-कर्मचारी वर्गाची कामगिरी उल्लेखनीय असून कोरोना तसेच टाळेबंदी काळात उत्पन्नवाढीत राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. इंधन बचत काळाची गरज ओळखून ती सर्वांसाठी फायद्याची ठरेल. या कार्यक्रमासाठी आरटीओचे सहाय्यक अधिकारी किरण पाटील, राकेश पाटील, रामवाडी यंत्र विभागातील अधिकारी विकास माने, सहाय्यक अधिकारी बी. एम. ज्युनेदी, आगार व्यवस्थापक युवराज कदम, अशोक पवार, पेण स्थानकप्रमुख अशोक गायकवाड, युवराज पवार, शैलेश पाटील आदींची उपस्थिती होती.