Breaking News

‘रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा’

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

नवीन पनवेल येथे प्री इव्हेंट उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा जानेवारी 2021 मध्ये सातवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेविषयीची माहिती जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचावी म्हणून नवीन पनवेल येथे रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हा प्री इव्हेंट शनिवारी (दि. 16) झाला.

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या पार्श्वभुमीवर महापालिका सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल येथे रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विविध खेळ व उपक्रम घेऊन नाट्यक्षेत्राविषयी आणि स्पर्धेविषयी माहिती देत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्यात आली. या कार्यक्रमाला नाट्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला.

वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका राजश्री वावेकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या सहकार्यवाहक स्मिता गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी काळात पनवेल महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अशा प्रकारचे प्री इव्हेंट घेण्यात येणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.

रसिक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या पुणे केंद्रातील प्राथमिक फेरीला नुकताच पिंपरी चिंचवड येथे प्रारंभ झाला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होत असतात. स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळतो. रसिकांसाठी मनोरंजनाची भरपूर मेजवानी ही स्पर्धा दरवर्षी घेऊन येत असते.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply