जेएनपीटी : प्रतिनिधी : मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेकाप महाआघाडीच्या वतीने शरद पवारांचे व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे उमेदवार असल्याने शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात काटे की टक्कर होणार, अशी चर्चा राजकीय गोटात वर्तविण्यात येत आहे, मात्र मावळ लोकसभा मतदारसंघातील उरणच्या प्रचार दौर्याप्रसंगी महाआघाडीचा जनाधार नसलेल्या
नेत्यांमुळे पार्थ पवार यांच्या प्रचार दौर्याला महाआघाडीच्या कार्यकर्त्याकडूनच गावागावात अल्प प्रतिसाद मिळाल्याने जनाधार नसलेल्या नेत्यांमुळे पार्थ पवारांच्या रूपाने पवार कुटुंबीयांचा पराभव हा अटळ आहे, अशी चर्चा सध्या उरण तालुक्यात वर्तविण्यात येत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात येणार्या उरण तालुक्यात आज भाजप लोकनेते रामशेठ ठाकूर व महेश बालदी यांच्या नेतृत्वामुळे एक नंबरचा पक्ष म्हणून ओळखला जातो, तर शिवसेना हा आमदार मनोहर भोईर यांच्यामुळे दोन नंबरचा पक्ष म्हणून आपली ओळख निर्माण करीत आहे. त्यानंतर शेकाप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष हे आपले स्थान जनमानसात निर्माण करीत आहेत. यातील भाजप, शिवसेना पक्ष वगळता उर्वरित पक्षांकडे तालुक्याचे नेतृत्व करणारे व जनमानसात ठसा उमटविणारे नेतेच नसल्याने आज या पक्षातील कार्यकर्ते नेतृत्वहिन होऊन अंतर्गत गटातटाच्या राजकारणामुळे आपल्या पक्षापासून दूर गेली आहेत.
तू राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेकाप महाआघाडीत जनाधार नसलेल्या नेत्यांनी पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते यांना डावलून पार्थ पवारांच्या प्रचारांची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभ दिनी निवडणूक प्रचार दौर्याप्रसंगी उरण तालुक्यात आलेल्या पार्थ पवार यांच्या प्रचार दौर्याकडे महाआघाडीच्या काही निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र पाहावयास मिळाले.