Breaking News

संभाव्य वार्षिक वित्तपुरवठा आराखड्याचे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते विमोचन

अलिबाग : जिमाका

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमार्फत (नाबार्ड) रायगड जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या पुढील आर्थिक वर्ष 2021-22च्या प्राधान्य क्षेत्रासाठी एकूण चार हजार 448.86 कोटी रुपयांच्या संभाव्य वित्तपुरवठा आराखड्याचे विमोचन शुक्रवारी (दि. 22) जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या  जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आले.

जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गोपाल मावळे, सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग सुरेश भारती, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर शमपा बिसवास, जिल्हा अग्रणी बँकेचे निंबेकर यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विशेषत: पीक कर्ज व कृषी क्षेत्र तसेच इतर विविध प्राधान्य क्षेत्रांसाठी नाबार्डमार्फत आकलन करण्यात आलेल्या संभाव्य वित्तपुरवठ्याचे नियोजित लक्ष्य प्राप्त करण्याचे व अधिकाधिक वित्तपुरवठा करण्याच्या सूचना सर्व बँकांना दिल्या. तसेच पशुपालन व मत्स्यपालन अंतर्गत केसीसी वाटप करण्याचे आदेश दिले.

नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक सुधाकर रघतवान यांनी सन 2021-22 या पुढील आर्थिक वर्षासाठी प्राधान्य क्षेत्रासाठीचा चार हजार 448 कोटी 86 लाख रुपयांचा संभाव्य वित्तपुरवठा आराखडा सादर केला. चालू आर्थिक वर्ष चार हजार 448 कोटी 86 लाखांच्या आराखड्याच्या तुलनेत पुढील आर्थिक वर्षासाठी 479 कोटी 13 लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. एकूण संभाव्य वित्तपुरवठ्यापैकी पीक कर्ज, कृषी क्षेत्र, सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम आणि इतर प्राधान्य क्षेत्रांसाठी (निर्यात, शैक्षणिक कर्ज, गृहनिर्माण कर्ज, अक्षय ऊर्जा क्षेत्र, सामाजिक पायाभूत सुविधा व इतर क्षेत्र, इ.) अनुक्रमे 859.54 कोटी, एक हजार 961 कोटी व एक हजार 626 इतक्या संभाव्य वित्तपुरवठ्याचे आकलन करण्यात आले. पीक कर्जामध्येही 34 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply