Breaking News

अरुण जेटली अनंतात विलीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना रविवारी (दि. 25) अखेरचा निरोप देण्यात आला. दिल्लीतील यमुना तिरावरील निगमबोध घाटावर जेटली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा रोहन याने वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. या वेळी विविध पक्षांचे राजकीय नेते उपस्थित होते.

जेटली यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते उपस्थित होते.

अंत्यसंस्कार करण्यापूर्वी जेटलींचे पार्थिव दिल्लीत भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा व अन्य मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर दुपारी 1 वाजता अरुण जेटली यांच्या अंत्ययात्रेला भाजप मुख्यालयातून सुरुवात झाली. निगमबोध घाटावर सव्वातीनच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply