नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांबाबत शरद पवारही आपली भूमिका बदलतील आणि आपल्या शेतकर्यांना या कायद्यांचे फायदे समजावून सांगतील, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमधील तरतुदी आणि पवार कृषिमंत्री असताना कायद्यात सूचविलेले बदल यांची पवारांनी तुलनात्मक समीक्षा केली होती. त्यानंतर तोमर यांनी आपले मत मांडले आहे. तोमर म्हणाले, पवारांसारखे अनुभवी नेतेही नव्या कृषी कायद्यांतील तथ्यांबाबत चुकीची माहिती देत होते, परंतु आता त्यांच्याकडे खरी माहिती आहे. मला आशा आहे की, ते आपली भूमिका बदलतील आणि आपल्या शेतकर्यांना या कायद्यांचे फायदे समजावून सांगतील.