पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या तिसर्या व अंतिम दिवशीही रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. त्यामुळे स्पर्धा हाऊसफुल्ल झाली. अंतिम फेरीतील एकूण 24 पैकी 18 एकांकिका शुक्रवार व शनिवारी सादर झाल्या. रविवारी सहा एकांकिकांचे सादरीकरण होते. या एकांकिकांनाही प्रेक्षकांनी दाद देत तुफान प्रतिसाद दिला. बहारदार एकांकिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी क्लिक (ओम साई कलामंच, वसई), लव्ह अॅण्ड रिलेशनशिप (आमचे आम्ही, पुणे), विसर्जन (श्रुजन कलामंच, बोरिवली), नंगी आवाज (कोकण ज्ञानपीठ, उरण), यंदा कर्तव्य आहे (केईएस कॉलेज, मुंबई), लॉटरी तिकीट (कला कारखाना, कांदिवली), स्टार (जिराफ थिएटर, मुंबई), पँडल (रिफ्लेशन थिएटर, पनवेल), लकडबगधा (दवेरथ थिएटर, डोंबिवली), तर दुसर्या दिवशी वण्डरिंग बोट (एमडी कॉलेज, मुंबई), नातं (व्हाइट लाइट, ठाणे), आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), बारसं (कलांश थिएटर, रत्नागिरी), जाळ्यातील खिळे (बोलपट, पुणे), गुंतता (निर्मिती, वसई), घरोट (नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई), दुसरा आइन्स्टाइन (सौ. नलिनी यशवंत दोडे विद्यालय, मुलुंड), 12 किमी (एएसएम प्रोडक्शन, मुंबई) या एकांकिकांचा प्रेक्षकांनी आस्वाद घेतला, तर तिसर्या दिवशी आर ओके (सीकेटी कॉलेज, पनवेल), भाद्रपद (कलारंग सामाजिक संस्था, अलिबाग), शुद्धता गॅरेंटेड अर्थात पाणी (मॉर्निंग ड्रीम एंटरटेन्मेंट, मुंबई), बेड टाइम (रूद्र प्रोडक्शन, इचलकरंजी), कुणीतरी पहिलं हवं (बीएमसीसी, पुणे), बिनविरोध (रंगपंढरी, पुणे) या सहा एकांकिकांचे सादरीकरण होते. कोरोना काळात शासन निर्देशानुसार आयोजकांनी घेतलेल्या काळजीमुळे मनमुराद आनंद घेतल्याची प्रतिक्रिया कलाकार व प्रेक्षकांकडून व्यक्त झाली.