Breaking News

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अ‍ॅड-मॅड शो स्पर्धा

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने अ‍ॅड-मॅड शो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा बुधवारी (दि.13) सकाळी 10 ते 1 च्यादरम्यान आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमधे महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या विशिष्ट कला व सर्जनशीलतेचे प्रदर्शन करून विविध प्रकारच्या जाहीराती सादर केल्या. कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य विभागप्रमुख नम्रता गजरा यांनी केले. तसेच प्रा. राहुल कांबळे, प्रा. नम्रता पारिक व सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हे कार्यक्रम यशस्वीरित्या होण्यासाठी मेहनत केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्षच्या समन्वयक महेश्वरी झिरपे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिक्षकांचे कौतुक केले. तसेच स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख व सचिव डॉ. सिदेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply