Breaking News

जंजिरा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी

मुरूड शहरातील आझाद चौकात रविवारी (दि. 31) जंजिरा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रथेप्रमाणे ध्वजारोहण झाले. मुरूड, श्रीवर्धन व म्हसळा या तीन तालुक्यांवर नवाबाची राजवट होती. मुरूड येथील राजवाड्यातून ते कारभार चालवत. देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, तरीही जंजिरा संस्थान नवाबाच्या ताब्यात असल्याने ते भारतात विलीन होण्यासाठी 31 जानेवारी 1948 साल उजाडले. दरवर्षी हा दिवस पत्रकार संघाच्या वतीने जंजिरा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अन्य कार्यक्रम आयोजित न करता केवळ ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार तसेच नागरिक उपस्थित होते.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply