अलिबागमध्ये ईमेज कॅलेंडर प्रकाशन सोहळा

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबागमधील वृत्तपत्र छायाचित्रकार यांच्या इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी (दि. 18) येथील हाटेल गुरुप्रसाद येथे आयोजित करण्यात आला. अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा झाला.

या वेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, जिल्हा माहिती अधिकारी मनोज  सानप, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, रायगड जिल्हा फोटोग्राफर्स व व्हीडीओ ग्राफर्स असोसिएशनचे विवेक सुभेकर, काँग्रेसचे अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर आदी उपस्थित होते.

इमेज कॅलेंडर 2021 साठी गड आणि निसर्गचित्र हा विषय निवडला होता. सामाजिक बदलाची आणि स्वच्छतेची चळवळ तसेच गड किल्ल्यांचे महत्व समाज मनात तेवत ठेवण्याचा प्रयत्न अलिबागमधील रमेश कांबळे, जितू शिगवण आणि समीर माळोदे या तीन वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या संक्लपनेतून इमेज कॅलेंडरने दिनदर्शिकांच्या स्पर्धेत आपले स्थान पटकावले आहे.

छायाचित्रकारांनी रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक इमेज आपल्या कॅमेर्‍यात बंद केल्या आहेत. कॅलेंडरवरील छायाचित्रे रायगड जिल्हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. त्याचबरोबर आध्यात्माची देखील त्याला जोड आहे. यामुळे पर्यटकांना रायगड जिल्ह्यातील निसर्ग पाहण्यासाठी खुणावणारी हे इमेज कॅलेंडर आहे, असे रायगड जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेष मोहिते यांनी सांगितले.

इमेज कॅलेंडरने आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेचे पारितोषिक वितरण या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 788 छायाचित्रांमधून 12 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply