Breaking News

पनवेलमध्ये भिकारीमुक्त अभियान

पनवेल : वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून पनवेल शहरात भिकार्‍यांची संख्या वाढत चालली होती. यातूनच छोट्या-मोठ्या चोर्‍यामार्‍या वाढल्या होत्या. या दृष्टीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी भिकारीमुक्त अभियान राबविण्यास सुरवात केली आहे.  शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी असणार्‍या भिकार्‍यांविरूद्ध आता धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. बाजारपेठ, एसटी स्टँड, उड्डाणपूलाखाली, रेल्वे स्थानक, विविध मंदिरे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात भिकारी वावरत असून यात लहान मुलेही भीक मागताना गाडीच्या मागे धावतात. त्यातून अपघातही घडतो. हे सर्व टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे पनवेल शहर पोलिसांनी भिकारीमुक्त अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि. 19) पनवेल परिसरातील 24 भिकार्‍यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना मुंबई येथील कोर्टात हजर करण्यात आले. यापुढेही अशा प्रकारची कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply