पनवेल : रामप्रहर वृत्त


जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर देशभरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. या हल्ल्यातील शहिदांना पनवेल शहरातील वडाळे तलावाजवळ शनिवारी (16 फेब्रुवारी) श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे आदींसह नागरिक उपस्थित होते. सर्वांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.