कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
डेंग्यूच्या विषाणुवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी, या मागणीचे निवेदन शिवसेना (शिंदे) गटाच्या वतीने सोमवारी (दि. 3) कर्जत नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले. कर्जत शहरात ज्या ठिकाणी नवीन इमारत बांधकामाचे काम चालू आहे, त्या ठिकाणी पाण्याचा साठा जास्त प्रमाणात असतो. तेथे अळ्याचे प्रमाण वाढत असून संपूर्ण कर्जत शहरात औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. कर्जत नगर परिषदचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र गोसावी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख अभिषेक सुर्वे, नगरसेवक संकेत भासे, शहर संघटक नदीम खान, शहर संपर्क प्रमूख अभिजित मुधोळकर, उपशहर प्रमूख मोहन भोईर, वैभव सुरावकर, दिनेश कडू, सल्लागार अशोक मोरे, अरुण मालुसरे, तेजस गायकर, भालचंद्र कर्णूक, जयदीप शिंदे, सचिन भोईर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.