Breaking News

जासईत शुभचिंतन; पारितोषिक वितरण

उरण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकेनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये शुभचिंतन सोहळा आणि वार्षिक पारितोषक वितरण समारंभाचे आयोजन शनिवारी (दि. 16) करण्यात आले होते. हा समारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास उरणचे आमदार मनोहर भोईर, स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन अरुण जगे, सरपंच संतोष घरत, जेएनपीटी विश्वस्त रवी पाटील, राष्ट्रीय पुरस्कार विजेते नंदकुमार साळवी, कामगार नेते सुरेश पाटील, मेघनाथ म्हात्रे, मुख्याध्यापक रतन वाघमारे, उपमुख्याध्यापक एम. एस. बल्लाळ, पर्यवेक्षक ए. ए. मांडवकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply