नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने झोकात पुनरागमन केले. विनेशने 2017च्या विश्वविजेत्या व्ही. कॅलाडझिन्स्कायला नामोहरम करून कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे सुवर्णपदक रविवारी जिंकले.
जागतिक क्रमवारीत तिसर्या स्थानावरील विनेशला 53 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या बेलारूसच्या कॅलाडझिन्स्कायने तोलामोलाची लढत दिली. विनेशने सुरुवातीला 4-0 अशी आघाडी घेतली. मग कॅलाडझिन्स्कायने 4-4 अशी बरोबरी साधली. विनेशने पुन्हा 6-4 अशी आघाडी घेतली. कॅलाडझिन्स्कायने दडपण वाढवत चार गुणांची कमाई करीत आगेकूच केली, पण विनेशने चार गुणांची कमाई करीत 10-8 अशा फरकाने लढतीवर वर्चस्व गाजवले.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …