Breaking News

आर्या संस्थेतर्फे आपटा रोपाचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा या सणाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेने आपटा या वृक्षाची रोपे वाटप केली. उरण, पनवेल, पेण येथे या वृक्षांची रोपे लावण्यात आली. या वेळी आपटा वृक्षाबद्दल  माहिती असलेली पत्रकेही वाटण्यात आली.

वृक्षतोडीमुळे निर्माण झालेला असमतोल दूर करण्याचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा व वृक्ष संवर्धन व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी संस्थेचे सुबोध म्हात्रे, मंगेश कांबळी, सुधीर पाटील यांच्या हस्ते ज्ञानेश्वर बढे, जगदीश सारडेकर, रेवती सारडेकर, हर्षाली ढाकोळ, संग्राम रोडगे, सुनील कटेकर, अरुण पाटकर आदी मान्यवरांना आपट्याची रोपे भेट देण्यात आली.

पनवेल येथे झालेल्या वनौषधी परिचय शिबिरात वनौषधी तज्ज्ञ सुधीर पाटील यांनी आपटा या वृक्षाबद्दल अनमोल माहिती दिली. आपटा ही वनस्पती वात, पित्त, कफ, अतिसार, मधुमेह, कंठरोग, विषमज्वर, लघवीतून खर जाणे, नाळगुंद, सूज, जखम, गंडमाळा, पोटविकार, मुतखडा यावर खूपच उपयुक्त असल्याची माहिती सुधीर पाटील यांनी दिली. दसर्‍याला आपटा या वृक्षाची तोड न करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनास खूपच चांगला प्रतिसाद मिळाला, असेही सुधीर पाटील यांनी या वेळी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply