Breaking News

रायगडमधून दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण; सन्डे सायन्स देणार चश्मे

अलिबाग ः प्रतिनिधी

चंद्रग्रहण, सूर्यग्रहणाच्या बाबतीत असणार्‍या गैरसमजुती आता बर्‍यापैकी कमी झाल्या आहेत. याचमुळे ग्रहण कसे असते याबद्दल पालकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्येही कुतूहल वाढत आहे. येत्या 26 डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होत असून तब्बल एका दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, संडे सायन्सतर्फे सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहता यावे यासाठी खास चष्मे देण्यात येणार आहेत. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यांतील काही शहरांमधून हे ग्रहण कंकणाकृती स्वरूपात दिसणार आहे. उर्वरित भागात खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. कोकणातून हे ग्रहण सकाळी 8 ते 11 वाजण्याच्या दरम्यान खंडग्रास स्वरूपात दिसणार असल्याचे संडे सायन्स स्कूलचे डॉ. अरविंद केळकर यांनी सांगितले. या ग्रहणादरम्यान 78.58 टक्के सूर्यबिंब चंद्राने झाकले जाणार आहे. हे ग्रहण अधिकाधिक विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे पाहता यावे यासाठी  खास चष्मे सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. 10 डिसेंबरपर्यंत आगाऊ नोंदणी केल्यास हे चष्मे सवलतीच्या दरात मिळणार असल्याची माहिती डॉ. केळकर यांनी दिली. अधिक माहितीसाठी 9422371060 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply