पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील न्हावेखाडी येथील श्री गणेश क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत ओमसाई सावळे (रसायनी) संघाने विजेतेपद पटकाविले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या संघाला 50 हजार रुपये व चषक असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
महेश्वरी मैदानात तीन दिवस ही स्पर्धा खेळली गेली. स्पर्धेत द्वितीय क्रमांक विठ्ठल जासई (25 हजार रुपये व चषक), तर तृतीय क्रमांक अर्णव इलेव्हन बेलपाडा (12,500 रुपये व चषक) या संघाने प्राप्त केला. स्पर्धेतील मालिकावीर किताबासाठी अक्षय पवार (सावळे), उत्कृष्ट फलंदाज जयदीप म्हात्रे (जासई) आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रोहित केदारी (सावळे) यांची निवड करून त्यांना बक्षीस देण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभास लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपसरपंच सागरशेठ ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य अरुणशेठ ठाकूर, जि. प. शाळेचे सभापती नरेश मोकल, दर्शनशेठ ठाकूर, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, खेळाडू उपस्थित होते.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …