Breaking News

खोपोलीतील शिबिरात 65 जणांचे रक्तदान

कर्जत : बातमीदार

येथील सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांनी  श्री वासुदेव सेवा मंडळ आणि स्वराज मित्र मंडळ यांच्या सहकार्याने नुकतेच खोपोली येथील ओम सद्गुरू प्रतिष्ठानच्या सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात एकूण 65 जणांनी रक्तदान केले.

या शिबिरात घाटकोपर येथील समर्पण नर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रक्तसंकलनाचे काम केले. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री वासुदेव सेवा मंडळ आणि स्वराज मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

रायगडावर पुस्तक प्रकाशन

माणगाव : प्रतिनिधी

‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा‘ या पुस्तकाच्या दूसर्‍या भागाचे प्रकाशन किल्ले रायगड येथे एमईपीएलचे सुधीर म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे, मी मराठी व्यावसायिक एकीकरण समितीचे मंदार नार्वेकर या वेळी भाषणे झाली. रचना बागवे, हेमंत सावंत, सुशील कदम, भालचंद्र खाडे आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply