Breaking News

विविध कार्यक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा

शिवाजीनगर शाळेत विविध उपक्रम; पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामजिक उपक्रम पनवेल तालुक्यात राबविण्यात येत आहेत. त्यानिमित्त शिवाजीनगर शाळेमध्ये शाळा बाह्य प्रवेश, साहित्य व कपडे वाटप आणि स्त्री सक्षमीकरणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमात गव्हाण ग्रामपंचायत सरपंच हेमलता भगत, वहाळ ग्रापंचायत सरपंच पूजा पाटील, न्हावे ग्रामपंणचायत उपसरपंच साधना तांडेल, छत्रपती विद्यालय मुख्याध्यापिका श्रीमती खाटावकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अस्मिता, कल्पना ठाकूर, पत्रकार विनिता बर्फे, मोरू नारायण विद्यालयाच्या नम्रता न्यूटन, श्रीमती पॉल, श्रीमती जितेकर, सपना लाड आदी उपस्थित होते.

कामोठ्यात हळदी-कुंकू, कोरोना योद्धांचा सन्मान
कामोठे : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष आणि संकल्प फाऊंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन कामोठे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. या वेळी पनवेल महापालिकेच्या कुसूम म्हात्रे, नगरसेविका अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, हेमलता गोवारी, महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा चिटणीस जयश्री धापटे, कामोठे शहर महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, उपाध्यक्षा साधना आचार्य, रश्मी भारद्वाज, सचिव दिपाली तिवारी, फातिमा आलम, सदस्या जयश्री पाटील, आयोजक तथा सचिव वैशाली जगदाळे, वर्षा शेलार, मनिषा वनवे, सुरेखा लांडेे, अणुसुचीत जाती सदस्या ललीता इनकर, जयलक्ष्मी भोसले, पल्लवी पाटील, सारीका पाटील यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करून विजेत्या महिलांना पैठणी साडी तसेच आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.

घरातील महिलांच्या कामात पुरुषांची मदत; महिला दिनी कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वास्कर, उपसरपंच विनोद भोईर, ग्रामपंचायत सभासद व गावातील होतकरु युवकांची संकल्पना आणि पुढाकाराने सोमवारी (दि. 8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एक दिवस आराम आईसाठी एक दिवस गृह लक्ष्मीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आपल्या घरातील आई, पत्नी नेहमी घरकाम करत असतात. आणि हि सर्व कामे ते आवडीने करत असतात त्यामुळे त्यांना आपण एखादा दिवस आराम दिला पाहिजे. ही संकल्पना घेऊन वेगळा व आदर्श उपक्रम राबविण्याचा मानस करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात 6 मे 2020 ला सुद्धा असाच उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्याच अनुषंगाने जागतिक महिला दिनानिमित्त पुरुष मंडळींनी महिलांना एक दिवस आराम देऊन घरातील सर्व घरकाम करण्याचा उपक्रम अर्थात ’एक दिवस आराम आईसाठी एक दिवस गृह लक्ष्मीसाठी’ हाती घेतला. या उपक्रमात पुरुषांनी घरात आपली आई किंवा गृहलक्ष्मी जी कामे दिवसभर करतात ती कामे जबाबदारीने करीत महिलांप्रती आदर भावना व्यक्त केल्या. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे पंचक्रोशीमधील नागरिकांनी व खास करून महिलांनी या अत्यंत वेगळ्या कार्यक्रमामुळे आनंद व्यक्त केला.

पनवेल मनपातर्फे महिलांसाठी कायदेविषयक ऑनलाइन मार्गदर्शन
पनवेल : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील तज्ज्ञ महिलांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 8) दुपारी 3 वाजता पालिकेच्या पनवेल महानगरपालिका या अधिकृत खात्यावरून हा ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात महिलांसाठीचे कायदे याविषयावर ज्येष्ठ विधी तज्ज्ञ अ‍ॅड. कृष्णा ठक्कर, महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर आणि आर्थिक व्यवस्थापन याविषयावर अ‍ॅड. दिपा राऊत मार्गदर्शन केले. या वेळी इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर यांनी यशस्वी होताना आलेले जीवनानुभवाचे कथन केले. अ‍ॅड. दिपा राऊत यांनी बँक आणि दैनंदिन होणारे व्यवहार, आर्थिक नियोजन, बचत गटांना बँकांच्या वतीने केले जाणारे अर्थसहाय्य याविषयी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ विधी तज्ज्ञ अ‍ॅड. कृष्णा ठक्कर यांनी पॉस्को कायदा, पोश कायदा, घरगुती अत्याचार या विषयी मार्गदर्शन केले. या वेळी वक्त्यांनी श्रोत्यांच्या विविध प्रश्नांचे निराकरण केले. या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला बालकल्याण समितीच्या मोनिका महानवर, नगरसेविका सुशिला घरत, प्रिती जॉर्ज, राजेश्री वावेकर, अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी उपस्थित होत्या.

जासई विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
उरण : वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील, लाईट ऑफ लाईफच्या संचालीका सारीका राऊत, ग्रामपंचायत सदस्या अरुणा घरत, मनिषा घरत, जयश्री घरत, पुजा कांबळे, शकुंतला घरत, कविता म्हात्रे, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख, पर्यवेक्षक साळुंखे सर, बी. एल. पाटील, एम. एस. ठाकूर, एन. पी. नाईक, एस. व्ही. पाटील, एस. एम. बाबर तसेच विद्यालयातील सर्वमहिला सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कै. मुग्धा लोंढे यांच्या स्मरणार्थ कीर्तनस्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका कै. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ महिलांसाठी नारदीय कीर्तनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वय वर्षे 20 ते 40 या वयोगटातील महिलांसाठी आयोजित ही स्पर्धा पनवेल येथील विरुपाक्ष मंदिरात झाली. यात राज्यभरातील महिला कीर्तनस्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. भक्तिभावपूर्ण वातावरणात झालेल्या स्पर्धेत गौरी खांडेकर हिने प्रथम, ज्योत्स्ना गाडगीळ हिने द्वितीय, सायली मुळे हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. सुखदा मुळे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विद्यमान नगरसेविका रूचिता लोंढे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. ह.भ.प. समीरबुवा ओझे आणि अंजली जोशी यांनी स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून काम पाहिले. नंदकुमार कर्वे व वैशाली कुलकर्णी यांनी संवादिनीसाथ, तर गणेश घाणेकर यांनी तबलासाथ केली. किरण बापट यानी सूत्रसंचालन केले. गुरुनाथ लोंढे परिवार, चंद्रकांत मने, हर्षदबुवा मांजरेकर आदींनी स्पर्धेच्या नियोजनासाठी मोलाचे योगदान दिले. कीर्तनगुरू नंदकुमार कर्वे आणि राजेंद्र मांडेवाल यांनी स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कीर्तनपरंपरा हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. सध्याच्या मोबाइल युगातही आपले संस्कार टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य या कीर्तनामध्ये आहे. नवोदित कीर्तनकाराना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा किंवा उत्सव आयोजित करणे ही काळाची गरज आहे.
-रूचिता लोंढे, नगरसेविका, आयोजक

पनवेल शासकीय विभागात कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये प्रभाग क्र. 18 चे नगरसेवक तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या वतीने ‘ती चा सन्मान’ पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. पनवेलच्या शासकीय विभागात कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला. आजची स्त्री सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहे. सरकारी, निम सरकारी आणि खाजगी या सर्व क्षेत्रात स्त्रीयांचे कार्य अतुलनीय आणि उल्लेखनीय आहे. अशा सर्व पनवेल शासकीय विभागात म्हणजे पनवेल-नवीन पनवेल पोस्ट ऑफिस, पनवेल महानगरपालिका, सेतू कार्यालय, तहसील कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, युपीएचसी-1, युपीएचसी-2, पनवेल शहर पोलीस स्टेशन आणि ट्रॅफीक पोलीस या ठिकाणी काम करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांना सन्मान पत्र, गुलाबाचे फुल आणि सॅनिटायजर देण्यात आले. सन्मान केल्याबद्दल सर्व माता भगिनींनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना धन्यवाद दिले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply