अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा पुरुष गटाच्या अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत चार ठिकाणी खेळली जाणार आहे. बुधवारी (दि. 15) पेझारी (ता. अलिबाग) व भेंडखळ (ता. उरण) येथे या स्पर्धेला प्रारंभ झाला. 17 डिसेंबर रोजी अलिबाग तालुक्यातील सहाण येथे अंतिम फेरी खेळली जाणार आहे.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 256 संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. चार गटांतील सामने चार ठिकाणी खेळवले जाणार आहेत. 15 डिसेंबर रोजी 1 ते 64 संघांचे सामने भैरवनाथ क्रीडा मंडळ यांच्या यजमानपदाखाली पेझारी येथे, तर 65 ते 128 संघांचे सामने नवकिरण क्रीडा मंडळाच्या यजमानपदाखाली भेंडखळ येथे, 16 डिसेंबर रोजी 129 ते 192 क्रमांकाचे सामने जय बजरंग क्रीडा मंडळाच्या यजमानपदाखाली अलिबाग तालुक्यातील साहण येथे तर 193 ते 256 क्रमांकाचे सामने पेण तालुक्यातील मुंढाणे येथे गावदेवी क्रीडा मंडळाच्या यजनमानपदाखाली खेळवले जाणर आहेत.
चार ठिकाणी खेळल्या जाणार्या चार गटांच्या सामन्यांमधून पहिले चार क्रमांकांचे संघ निवडले जातील. चार गटातून आलेल्या अव्वल 16 संघांचे सामने 17 डिसेंबर रोजी सहाण येथे खेळवले जातील. त्यातून विजेता संघ ठरेल. या स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी पाहून रायगड जिल्हा पुरुष कबड्डी संघ निवडण्यात येईल व हा संघ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सहभागी होईल.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …