Breaking News

कॅनडातही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बोलबाला; कोरोला लस पुरविल्याबद्दल पोस्टर लावून कौतुक

ओटावा ः वृत्तसंस्था

कोरोनाच्या वैश्विक महामारीने संपूर्ण जगालाच आपल्या कवेत घेतले. कोरोनामुळे लाखो लोकांचे बळी घेतले आहेत, परंतु आता कोरोनाची लस बाजारात आल्याने जगभरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशींचा पुरवठा केल्याबद्दल कॅनडा सरकारने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. कॅनडामधील ग्रेटर टोरंटो परिसरातील रस्त्यांवर भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या महासाथीत भारताने अनेक देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लशींचा पुरवठा केला. भारताने नुकतेच कॅनडाव्यतिरिक्त नेपाळ आणि बांगलादेशसह अनेक देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून दिली आणि या महासाथीशी लढण्यास मदत केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताकडे कॅनडाला कोरोना प्रतिबंधात्मक लशींचा पुरवठा करण्याची विनंती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लसीचा पुरवठा करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर भारतातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लशीचे पाच लाख डोस कॅनडामध्ये पोहोचले आहेत. याबद्दल कॅनडाने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply