Breaking News

सुभाष पुजारी ‘मास्टर भारत श्री’चे मानकरी

पनवेल ः वार्ताहर
इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या वतीने पंजाबमधील लुधियाना येथे आयोजित करण्यात आलेल्या 11व्या मेन्स ज्युनिअर, मास्टर, दिव्यांग, वुमेन ज्युनिअर, ज्युनिअर नॅशनल बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशीप 2021 या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघातून खेळताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष शंकर पुजारी यांनी भारत श्री 2021 किताबावर आपले नाव कोरले. हा किताब फडकविणार पुजारी हे देशातील पहिलेच पोलीस अधिकारी आहेत.
मास्टर भारत श्री 2021 शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये 80 किलो वजनी गटात सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकाविले. 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान मालदीव येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पुजारी भारताचे नेतृत्व करणार आहेत. राष्ट्रीय मास्टर एशिया श्री 2021 या बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये त्यांची निवड भारतीय संघातून झाली आहे. पुजारी हे पनवेल तालुक्यातील पळस्पे येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रात प्रभारी अधिकारी म्हणून कर्तव्यावर आहेत.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply