Breaking News

कर्मवीर मॅरेथॉनला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; पावसावर उत्साहाची मात

नवी मुंबई : प्रतिनिधी

पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या 132व्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील मॉडर्न स्कूल आणि कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 15) कर्मवीर मॅरेथॉन घेण्यात आली. या स्पर्धेत तब्बल 1200 विद्यार्थी धावपटूंनी सहभाग घेत उदंड प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे भरपावसात खेळाडूंनी दौड लगावली.

कर्मवीर मॅरेथॉनचे उद्घाटन सकाळी 7 वाजता माजी आमदार संदीप नाईक आणि नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. उद्घाटन समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर, प्राचार्य सुमित्रा भोसले, उपप्राचार्य डी. जी. बोटे, मॅरेथॉनचे समन्वयक डॉ. विवेक भोईर आदी उपस्थित होते.

विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तिपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या समारंभास नाईक यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दशरथ भगत, माजी नगरसेवक विक्रम (राजू) शिंदे आदी उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन सुजाता बोटे व डॉ. राजेश्री घोरपडे यांनी केले, तर डॉ. एजाज शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

रन फॉर क्वालिटी एज्युकेशन कर्मवीर मॅरेथॉनला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे नवी मुंबई परिसर, अलिबाग, खारघर, दहिसर, उरण आणि पनवेलच्या विविध 30 शाळा व 20 महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी कर्मवीर मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. या स्पर्धेला ‘रन फॉर क्वालिटी एज्युकेशन’ अशी थीम देण्यात आली होती. दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. त्या अनुषंगाने ही मॅरेथॉन घेण्यात आली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply