मुंबई ः प्रतिनिधी
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लग्नाच्या ब्रेकनंतर आपला आयपीएल संघ मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत 27 वर्षीय बुमराह टीम इंडियाचा भाग नव्हता. त्यामुळे त्याला क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल.
आयपीएल 2020मध्ये 15 सामन्यांत 27 बळी घेणार्या बुमराहने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो हॉटेलच्या रूममध्ये वर्कआऊट करताना दिसतो. 26 सेकंदाचा हा व्ह़िडिओ मुंबई इंडिन्सनेही शेअर केला आहे.
गेल्या हंगामात मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयपीएलनंतर तो भारतीय संघासमवेत ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने पहिल्या तीन कसोटी सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या. त्यानंतर तो चौथी कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळला नाही. बुमराहने अँकर संजना गणेशन हिच्यासोबत विवाह केला आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …