Breaking News

सुनील पाटीलचा राष्ट्रवादीशी काय संबंध? -आशिष शेलार

राज्य सरकारकडे कारवाईची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

धुळ्यातील सुनील पाटील याचा राष्ट्रवादीशी संबध काय? तो गायब झाला की राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी ठेवलेय? तो परराज्यातून ’गेम’ वाजवतो म्हणतोय त्यामुळे त्याच्यावर राज्य शासनाने तातडीने गुन्हा दाखल करून या केसचा संबंध आंतरराज्य असल्याने तपास सीबीआयकडे द्यावा, अन्यथा यामध्ये राज्य सरकारचे हात गुंतलेले आहेत हे स्पष्ट होईल. अशी आग्रही मागणी करीत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

गेले काही दिवस राष्ट्रवादीच्या सुरू असलेल्या पत्रकार परिषदा म्हणजे, ड्रग्ज आणि पोलीस बदल्यांमधील दलालांना वाचवण्यासाठी सुरू असलेला एकपात्री प्रयोग असल्याची टीकाही शेलार यांनी केला आहे. आज जे नाव समोर आले तो सुनील पाटील कोण आहे?, सुनील पाटील एनसीपीचा सदस्य आहे की नाही?. त्याचा राष्ट्रवादीशी संबंध काय?, असे सवाल शेलार यांनी उपस्थित केले आहेत. अजूनही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना संधी देत आहोत. खरे सांगा, नाही तर आता आमच्या हाताला बरेच काही लागले आहे. जर सत्य समोर आले तर तुम्हाला बाथरूमच्या आतमध्ये शौचालयात सुध्दा तोंड लपवायला जागा उरणार नाही, असा इशाराही शेलार यांनी दिला.

हा सुनील पाटील माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांची बदनामी करतो आणि राष्ट्रवादीला त्यांचे काही वाटत नाही. या सुनील पाटीलचा धंदा हा मंत्रालयातील बदल्यांच्या दलालीचा आहे. त्यामुळे हा सुनील पाटील गायब आहे की राष्ट्रवादीने त्याला लपवले आहे. पोलीस बदलत्यांमधील मुख्य दलाल हा गायब, परागंदा नसून त्याला राष्ट्रवादीने सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे का? संरक्षण दिले आहे का? सुनील पाटीलवर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे तपास द्यावा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

Check Also

सीकेटी कॉलेजमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर आर्टस्‌‍‍, कॉमर्स …

Leave a Reply