नवी मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सुरू असलेल्या आम्र मार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे बाधित होणार्या हेटवणे जलवाहिनीचे स्थलांतर करावयाचे असल्याने सोमवारी (दि. 20) सकाळी आठ वाजेपासून ते मंगळवारी (दि. 21) सकाळी आठ वाजेपर्यंत खारघर, उलवे, द्रोणागिरी, जेएनपीटी, ओएनजीसी, न्हावा आणि आजूबाजूच्या गावांमधील पाणी पुरवठा बंद राहिल. तसेच त्यानंतर पाणी पुरवठा सुरू झाल्यावर तो कमी दाबाने होईल. रहिवाशांनी पाणी जपून वापरावे व पाणी साठवण्याची योग्य ती व्यवस्था करावी असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.
Check Also
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण
पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …