Breaking News

स्वप्न साकार झाले!

दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतची प्रतिक्रिया

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर आयपीएल 2021मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा भारताचा डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत याच्याकडे देण्यात आली आहे.
कर्णधारपदी निवड झाल्यानंतर पंतने स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कर्णधारपदाविषयी बोलताना रिषभ पंत म्हणाला, दिल्लीतच मी वाढलो आणि मोठा झालो. सहा वर्षांपूर्वी दिल्लीतूनच माझ्या आयपीएल करिअरला सुरुवात झाली. या टीमचे नेतृत्व करणे हे स्वप्न मी आजपर्यंत पाहात आलो आहे. ते आज सत्यात उतरले. मला त्याचा खूप आनंद आहे. मी संघव्यवस्थापनाचा आभारी आहे की त्यांनी कर्णधारपद सांभाळण्यासाठी
मला योग्य मानले आणि मला ही संधी दिली.
उत्तम कोचिंग स्टाफ आणि दिग्गज वरिष्ठ खेळाडू सोबत असल्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससाठी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक आहे, असेही रिषभने सांगितले.
रिषभ पंतने आयपीएलमध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. रिषभ आतापर्यंत 68 आयपीएल सामने खेळला आहे. यामध्ये त्याने तब्बल 183 चौकार आणि 103 षटकारांनिशी दोन हजार 79 धावा फटकावल्या असून, त्यात एक शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.
यंदाच्या आयपीएलमधील ठरला सर्वांत युवा कर्णधार
दिल्ली कॅपिटल्स कर्णधार रिषभ पंत हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वांत, तर आयपीएलच्या इतिहासात पाचवा युवा कर्णधार ठरला आहे. 23 वर्ष व सहा महिने वय असलेल्या रिषभकडे दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
सुरेश रैना (23 वर्ष व तीन महिने), स्टीव्ह स्मिथ (22 वर्ष व 11 महिने) आणि विराट कोहली (22 वर्ष व सहा महिने) हे आयपीएलमधील युवा कर्णधारांमध्ये अव्वल तीन स्थानांवर आहेत. श्रेयस अय्यरने 23 वर्ष व चार महिन्यांचा असताना दिल्लीचे नेतृत्व हाती घेतले होते. तो चौथ्या स्थानी आहे.
सर्वांत युवा कर्णधारांमध्ये रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर असला तरी त्याच्याकडे रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. रोहितने 26 वर्ष व 27 दिवसांचा असताना आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. रिषभला यंदा जेतेपद पटकावून हा विक्रम मोडण्याची संधी आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply