Breaking News

भारताच्या दोन बॉक्सिंग प्रशिक्षकांना कोरोना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

राष्ट्रीय सराव शिबिरात भारतीय महिला बॉक्सिंगपटूंसोबत काम करणार्‍या दोन सहाय्यक प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत अडथळा आला आहे.

राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक सी. ए. कुट्टप्पा यांच्यासहित पतियाला येथील पुरुष संघातील 10 बॉक्सिंगपटूंना गेल्या आठवड्यात कोरोनाची बाधा झाली होती.

आता दोन सहाय्यक प्रशिक्षकांना करोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यासोबत सराव करणार्‍या काही खेळाडूंचीही चाचणी करण्यात आली असून, त्याचे अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply