Thursday , March 23 2023
Breaking News

किक बॉक्सिंग स्पर्धेत कर्जतच्या खेळाडूचे रूपेरी ‘यश’

कडाव : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यामधील कर्जतच्या यश हेमंत भोज या खेळाडूने पुणे बालेवाडी येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल लेव्हल किक बॉक्सिंग स्पर्धेतघवघवीत यश प्राप्त केले. त्याने रौप्य पदकावर नाव कोरत कर्जतचे नाव राष्ट्रीय स्तरावर कोरल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथील यश हेमंत भोज हा विद्यार्थी सध्या कर्जत येथे आपल्या परिवारासमवेत राहत असून याच वर्षी त्याने बारावीची परीक्षा दिली. तो गत दीड वर्षापासून कर्जतमधील युनायटेड शतकोन कराटे असोसिएशन या संस्थेत किक बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत होता. त्याला प्रथमच कर्जतमधून पुणे बालेवाडी येथे दिनांक 24 मार्च ते 28 मार्चपर्यंत सुरू असलेल्या नॅशनल लेव्हल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत कर्जत येथील तीन खेळाडू रवाना झाले होते. या स्पर्धेत यशने आपले खेळातील कसब सिद्ध करत रौप्य पदकापर्यंत मजल मारल्याने त्याला महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे प्रेसिडेंट संतोष म्हात्रे यांच्या हस्ते रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. त्या वेळी प्रशिक्षक जीवन ढाकवल व कर्जतमधील खेळाडू उपस्थित होते. त्यामुळे यशचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply