पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधील रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर व आयसीयु बेड असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण राज्यभर कोरोनाच्या महामारीने कहर केलेला असुन, आपल्या महानगरपालिका हद्दीतही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करून त्यांची अमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. महानगरपालिकेद्वारे विविध ठिकाणी नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. महानगरपालिककड़न उपलब्ध करून देण्यात आलेल्या आयसीयु व व्हेंटिलेटर बेड असलेल्या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाइकांना भेटणे शक्य होत नाही, त्यामुळे त्याकरीता सदरील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत जेणेकरून रुग्णांच्या नातेवाइकांना आपल्या रुग्णाला पाहणे शक्य होईल. पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधील रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर व आयसीयु बेडमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.