Breaking News

पनवेल महापालिकेचे भरारी पथक ‘त्या’ कोविड रुग्णालयांवर करणार कारवाई

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिकेने कोविड रुग्णालये शासनाने दिलेले नियम पाळत आहेत की नाही. यावर लक्ष ठेवण्याकरिता भरारी पथकाची नेमणूक केली आहे. रुग्णालयांचे निर्जंतुकीकरण, व्हेंटिलेटर बेड्स, ऑक्सिजन बेड्स अशा गोष्टींवर हे पथक लक्ष ठेवणार आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या रुग्णालयांवर कारवाई केली जात आहे. महानगरपालिकेने कोविड 19च्या उपचाराकरिता 44 खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालये म्हणून घोषित केले आहे. महानगरपालिकेचे तीन डॉक्टरांचे भरारी पथक रोज अशा दहा कोविड रुग्णांलयांना भेट देत आहे. ही कोविड रुग्णालये शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतात की नाही याकडे लक्ष ठेवण्याचे कार्य हे भरारी पथक करीत आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन सुविधा, अग्निशमन सुविधा तपासणे, शासनाच्या निर्णयाप्रमाणे एकुण खाटांपैकी 80:20 असे गुणोत्तराचे पालन करणे, वेळोवळी रुग्णांलयाचे निर्जंतुकीकरण करणे, दर्शनी भागात उपलब्ध खाटांची संख्या, उपलब्ध ऑक्सिजन बेड्सची संख्या आणि आकारण्यात येणार्‍या दरांबद्दल माहिती फलक लावणे, अनावश्यक रुग्णांना डिस्चार्ज देऊन बेड रिकामे करणे, असे अनेक मार्गदर्शक नियम शासनाने कोविड रुग्णालयांसाठी बंधनकारक केले आहेत. या नियमांचे पालन रुग्णालय करते आहे की नाही याचे निरीक्षण हे भरारी पथक करणार आहे. आत्तापर्यंत या पथकाने 12 रुग्णालयांना नोटीसा दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्‍या रुग्णालयांवर योग्य कारवाई करण्याची जबाबदारी या भरारी पथकांवर सोपविण्यात आली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply