Breaking News

श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाकडून निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांना डि.लिट. पदवी जाहीर

रेवदंडा : प्रतिनिधी
राजस्थानमधील श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाच्या वतीने सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल निरूपणकार श्री. सचिन धर्माधिकारी यांना डि.लिट. पदवी जाहीर करण्यात आली आहे. या संबंधी विद्यापिठाचे कुलपती डॉ. श्री. विनोद टीब्रेवाल यांचे पत्र शैक्षणिक संचालक डॉ. वनश्री वालेचा यांनी धर्माधिकारी यांना दिले.
यापूर्वी या विद्यापिठाने माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, अभिनेत्री हेमा मालिनी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, डॉ. डी. वाय. पाटील, जनरल जोगिंदर जसविंदरसिंग, डॉ. कमला बेनिवाल, डॉ. एस. सी. जमीर, बनवारीलाल जोशी, श्रीकेशरीनाथ त्रिपाठी आदी मान्यवरांना गौरविले आहे.
रायगडभूषण सचिन धर्माधिकारी हे गेली अनेक वर्षे रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. सामाजिक बांधिलकी व जाणीव ठेवून हे प्रतिष्ठान सातत्याने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असते.
याआधी सचिन धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल विद्यापिठ, फ्रान्सच्या डि. लिट. पदवीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा त्यांचा गौरव होत असल्याने श्रीसदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply