Breaking News

लसीकरण केंद्रात भाजपचा नोंदणी कक्ष

पनवेल : रामप्रहर वृत्त

संपूर्ण देश कोरोना महामारीच्या विळख्यामध्ये अडकला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम चालू झालेली आहे. येणार्‍या 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण चालू होणार आहे. त्या अनुषंगाने पनवेलमधील लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी भाजपकडून कक्ष उभारण्यात आले आहेत. पनवेल महानगर पालिकेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सेक्टर 15 येथे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. या सगळ्याचा ताण प्रशासकीय व्यवस्थेवर येऊ नये म्हणून खारघरमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, कार्यकर्ते एकत्र येऊन लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर प्राथमिक स्वरुपात मार्गदर्शन करणे व लोकांचे नोंदणी करून घेण्यासाठी या ठिकाणी कक्ष उभारण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते व नगरसेवक उपस्थित राहून लोकांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत. सर्व नागरिकांनी या संधीचा फायदा घेऊन आपली नोंदणी करून घ्यावी व लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन भाजप खारघरच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply