Breaking News

खरसई ग्रामपंचायत कर्मचार्याला मारहाण

म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

म्हसळा : प्रतिनिधी

तालुक्यातील खरसई ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचार्‍याला गुरुवारी (दि. 6) सकाळी मारहाण करण्यात आली. याबाबत पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत भिंकू पयेर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली आहे.

खरसई ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत हे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे एका भागातील पाणी बंद करून दुसर्‍या भागात पाणी सोडण्यास जात होते.

खरसई मोहल्यातील वसीम जहांगीर या युवकाने, पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत यांना आमच्या भागात पाणी सोडण्यास उशीर का झाला, असे विचारून मारण्यास सुरवात केली.

त्यात चंद्रकांत पयेर यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply