Sunday , June 4 2023
Breaking News

नवी मुंबई मॅरेथॉनमध्ये ज्ञानेश्वर मोरघा विजेता

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

फ्युचर जनराली नवी मुंबई मॅरेथॉनमध्ये 21 किमी शर्यतीत पुरुष गटात पालघरचा ज्ञानेश्वर मोरघा याने विजेतेपद पटकाविले. अक्षय पडवळ उपविजेता ठरला; तर महिलांमध्ये ताशी लाडोलने बाजी मारली. 10 किमीमध्ये मनोज कुमार यादव आणि वर्षा भावरी यांनी जेतेपद प्राप्त केले.

या स्पर्धेत आठ हजारांपेक्षा जास्त धावपटूंनी भाग घेतला. फ्युचर जनराली इंडियाचे कर्मचारी तसेच 75 पोलीस अधिकारीही सहभागी झाले होते.

माजी महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात आले. या वेळी फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. (एफजीआयआय)चे प्रिन्सिपल ऑफिसर श्रीराज देशपांडे, रिटेल सेल्स विभागाचे प्रमुख राघवेंद्र राव आदी उपस्थित होते.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply