वर्धा : आयपीएलचे 14वे पर्व स्थगित झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये 18 ते 23 जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीत न्यूझीलंडचा सामना करेल. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळेल. या दौर्यासाठी बीसीसीआयने शुक्रवारी (दि. 7) संघाची घोषणा केली. या संघात कर्णधार विराट कोहलीसह अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव यांचा समावेश आहे. लोकेश राहुल व वृद्धिमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर होईल, तर अभिमन्य इस्वरन, प्रसिध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला राखीव खेळाडू म्हणून आहेत.
Check Also
पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …