Breaking News

रोह्यात प्राथमिक शिक्षिकांचा महिला दिन उत्साहात साजरा

रोहे : प्रतिनिधी : तालुका प्राथमिक शिक्षिका यांच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहात महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यात रोहा तालुक्यातील 200 हून अधिक प्राथमिक शिक्षिकांनी उपस्थित राहून विविध कार्यक्रम सादर केले. या वेळी घेतलेल्या ‘पैठणी’च्या खेळात निवेदिता नाईक (रोठखुर्द) यांनी प्रथम, कल्पना पवार (धामणसई) यांनी द्वितीय, तर अश्विनी कारभारी (पिंगळसई) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. अश्विनी पार्टे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. तहसीलदार कविता जाधव, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधीक्षक डॉ. अंकिता खैरकर, गटविकास अधिकारी पी. के. राठोड, गटशिक्षण अधिकारी साधुराम बांगारे, प्रभारी विस्तार अधिकारी विनोद पाटील, विस्तार अधिकारी एस. एन. गायकवाड, राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस अनिल नागोठकर, जिल्हा कार्यालयीन चिटणीस ब्रिजेश भादेकर, रोहा तालुका अध्यक्ष अजय कापसे, उपाध्यक्ष विजय वेळे, सरचिटणीस नारायण गायकर, माधुरी डफळ, दिप्ती भोईर, विद्या रोहेकर, तन्वी गुरव, अश्विनी पार्टे, अनुराधा धुमाळ, छाया पवार, अरुणा लाड, पल्लवी गायकर, शर्मिला मोरे, अजिता घोडिंदे, लक्ष्मी सुर्वे, नेहा मोरे, श्वेता रिसबूड, रेश्मा पोळेकर, निकिता धुपकर आदीसह महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या. या वेळी सेवानिवृत्त महिला शिक्षिकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या रोहेकर यांनी केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply