Breaking News

संभाव्य अपघात टाळण्यासाठी भाजप पदाधिकार्‍यांनी बजावली दिशादर्शकाची भूमिका

नवी मुंबई : प्रतिनिधी

बेलापूर परिसरातील पारसिक हिल वनराई व डोंगराळ भागात रात्रीच्या अंधारात एक वृक्ष कोलमडला व रस्त्यावर पडला. त्यात पावसामुळे पथदिवे बंद असल्याने अपघात होण्याची शक्यता होती. ही माहिती भाजप पदाधिकारी सुभाष गायकवाड यांना मिळताच त्यांनी ते ठिकाण गाठले. त्यानंतर अंधारात वेगात येणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना पुढची वाट दाखवत सुमारे चार तास अंधारात दिशादर्शकाची भूमिका बजावली. त्यानंतर गायकवाड यांनी अग्निशमन दलाला माहिती देत घटनास्थळी बोलावले. बेलापूर येथील आयकर कॉलनी येथून आग्रोली येथे जाण्यास रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ मोठे वृक्ष आहेत तसेच टेकडीमुळे चढ-उतार आहेत. त्यातच रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास मुसळधार पावसामुळे वृक्ष कोसळले होते तसेच पावसाने विद्युत खंडित झाल्याने रस्त्यालगत असणारे विद्युत दिवे बंद होते. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता होती. याबाबत खबर भाजप पदाधिकारी सुभाष गायकवाड यांना प्राप्त झाली. त्यांनी तत्काळ अपघातस्थळ गाठले. त्यानंतर गायकवाड यांनी बेलापूर अग्निशमन दल कार्यालयात माहिती देऊन मदतीसाठी बोलविले, पण अग्निशमन दलाचे कर्मचारी दुसरीकडे गेल्याने त्यांना येण्यास विलंब झाला. मग गायकवाड व त्यांच्या अपघात होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सहकार्‍यांनी भरपावसात उभे राहून वाहनचालकांना जाण्याचा मार्ग दाखवला. यामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात झाला नाही. काही वेळाने अग्निशमन दलाचे कर्मचारी आले. त्यांनी वृक्षाची छाटणी करून वृक्ष रस्त्याच्या बाजूला केले तसेच पथदिवे देखभाल करणार्‍या ठेकेदारास पाचारण करून सुभाष गायकवाड यांनी पथदिवे चालू करून घेतले. यामुळे गायकवाड यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply