Breaking News

शिवरायांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला जाणार नाही

छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी

कौन बनेगा करोडपती या रिअ‍ॅलिटी शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने सोनी टीव्हीसोबत सूत्रसंचालन करणारे बिग बी अमिताभ बच्चन यांनाही टीकेचा सामना करावा लागत आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील या प्रकरणी संताप व्यक्त केला असून, शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत सुनावले आहे. शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करणे हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात राहता, मुंबईत राहता आणि महाराज यांचा एकेरी उल्लेख केला जातो. हे खपवून घेतले जाणार नाही, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे, तसेच अमिताभ बच्चन यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, अशी खंतही संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. शिवाजी महाराज यांचे नाव एकेरी घेतले, तर आम्ही काहीही करू शकतो, असा इशारा या वेळी त्यांनी दिला.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply