माणगाव ः प्रतिनिधी
तौक्ते चक्रीवादळाचा कोकणाला जबरदस्त तडाखा बसला. या वादळग्रस्त भागाची पाहणी करताना रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर असताना बुधवारी (दि. 19) सायंकाळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माणगाव येथे आले होते. त्या वेळी येथील सलून व्यावसायिकांनी आपली व्यथा त्यांच्यापुढे मांडली आणि या संदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
या वेळी फडणवीस यांच्यासमवेत रायगडचे माजी पालकमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते उपस्थित होते. त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे, भाजप तालुका सरचिटणीस योगेश सुळे, उमेश साटम, महिला मोर्चा माजी तालुकाध्यक्ष यशोधरा गोडबोले, रेश्मा मोहिते, शहराध्यक्ष राजू मुंढे, बाबूराव चव्हाण, संजय जाधव, राकेश गोसावी, विशाल गलांडे, संतोष कदम, सुरेश साळुंके, हरेश मुंढे, युवराज मुंढे, जयेंद्र मुंढे, कौस्तुभ वझे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.