Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांचा खारघरमध्ये रहिवाशांसोबत सुसंवाद

दुहेरी करप्रश्नी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर सेक्टर 11मधील केंद्रीय विहार संकुलातील रहिवाशांसोबत रविवारी (दि. 10) सुसंवाद साधला. या वेळी त्यांनी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करासंदर्भात भूमिका मांडत तो कसा योग्य आहे व तो का भरला पाहिजे हे सांगितले. त्याचबरोबर दुहेरी करातून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. खारघरच्या केंद्रीय विहार या रहिवासी संकुलात नवी कार्यकारिणी स्थापन झाली आहे. या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांनी माजी नगरसेवक गुरूनाथ गायकर यांच्याकडे विविध विषयांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट मागितली होती. त्यानुसार रविवारी खेळीमेळीच्या वातावरणात सकारात्मक बैठक झाली. या बैठकीस भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, हरेश केणी, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, माजी नगरसेवक  गुरूनाथ गायकर, भाजप जिल्हा चिटणीस गीता चौधरी, मंडल सरचिटणीस कीर्ति नवघरे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, संजय घरत, सोशल मीडिया सहसंयोजक मोना आडवाणी, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमर उपाध्याय, शैलेंद्र त्रिपाठी, गुप्ता, प्रशांत दुधम, केंद्रीय विहार फेडरेशनचे अध्यक्ष डी. एन. पौनीकर, सचिव सुनील साहु, खजिनदार दीपू सिंह व अन्य पदाधिकारी, सदस्य, रहिवासी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, केंद्रीय विहारमधील पदाधिकार्‍यांनी पनवेल महापालिकेच्या करासंदर्भात प्रामुख्याने प्रश्न विचारला आहे. दोन विषय त्यांनी मांडले. एक म्हणजे महापालिकेच्या स्थापनेपासून पूर्वलक्षी कर (रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स) लावलेला आहे आणि एलबीटी लावला जातोय याबाबतीत काय. या संदर्भात कायदेशीर प्रयोजन आहे त्या दृष्टिकोनातून जे आवश्यक आहे ते करण्यातून कुणाला सुट मिळू शकत नाही. मी त्यांना सांगितले की, महापालिका म्हणून जे व्यक्तिगत कुणावर अन्याय होत असले तर महापालिका स्तरावर जी मदत मिळाली पाहिजे ती मी व माझे सर्व सहकारी मिळून करू. सर्व्हिस चार्जबाबत बर्‍याचशा लोकांमध्ये आहे की डबल टॅक्सेशन होतेय. या संदर्भात पनवेल महापालिकेने एप्रिल 2021मध्ये ठराव करून राज्य सरकारकडे पाठविलेला होता. आता ज्या कुठल्या सोसायटीने सर्व्हिस चार्ज भरलाय आणि त्यांना महापालिकेचाही चार्ज लागला आहे त्यावर महापालिकेने ठराव करून पाठविला आम्हाला परवानगी द्या की, आम्ही त्यांचा सर्व्हिस चार्ज या करातून वळता करू किंवा परत करू. सरकारने त्याला मान्यता दिली तर महापालिकेला जनतेला दिलासा देता येईल. आता सरकार बदलल्यानंतर या संदर्भात आम्ही पाठपुरावा करू. येणार्‍या कालावधीत महापालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत असा लोकांचा आग्रह आहे आणि निश्चितपणे त्याचा पाठपुरावा आम्ही करू. या बैठकीनंतर पदाधिकारी व रहिवाशांनी समाधान व्यक्त करीत आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply