Breaking News

टोकियो ऑलिम्पिकमध्ये अशोक कुमार सामनाधिकारी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

जुलै-ऑगस्टमध्ये होणार्‍या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्ती सामन्यांत सामनाधिकारी (रेफरी) म्हणून अशोक कुमार यांचा समावेश झाला आहे. कुमार हे एकमेव भारतीय कुस्ती रेफरी म्हणून ऑलिम्पिकमध्ये असतील. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या खेळाच्या प्रशासकीय मंडळाने त्यांना नामांकन दिले आहे. ‘या स्पर्धेत निवडलेला मी एकमेव भारतीय रेफरी आहे. मी ऑलिम्पिकदरम्यान पदभार घेईन. ऑलिम्पिकमधील उमेदवारांची निवड करण्यासाठी निवड प्रक्रिया होती आणि मी ते निकष यशस्वीरित्या पूर्ण केले,’ असे कुमार यांनी आयएएनएसला सांगितले. कुमार यांना 2005मध्ये आंतरराष्ट्रीय रेफरी परवाना मिळाला. त्यानंतर 2018च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स आणि जकार्ता एशियन गेम्स यासह 100हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी काम केले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply