Breaking News

प्रजनेशचा निकोलोजवर सनसनाटी विजय

इंडियन वेल्स : वृत्तसंस्था

भारताच्या प्रजनेश गुणेश्वरने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तमविजय नोंदवताना इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानावर असलेल्या निकोलोज बासिलाशविलीचा पराभव केला. एकेरीच्या मुख्य फेरीत प्रथमच खेळत असलेल्या डावखुर्‍या प्रजनेशने 2 तास 32 मिनिटांत जॉर्जियाच्या खेळाडूचा 6-4, 6-7, 7-6ने पराभव केला.

जागतिक क्रमवारीत 97व्या स्थानी असलेल्या प्रजनेशने पहिल्या सेटच्या पाचव्या गेममध्ये बासिलाशविलीची सर्व्हिस भेदली आणि आपली सर्व्हिस कायम राखत 31 मिनिटांमध्ये सेट जिंकला. दुसर्‍या व तिसर्‍या सेटममध्ये संघर्षपूर्ण खेळ अनुभवायला मिळाला. दोन्ही सेट टायब्रेकपर्यंत लांबले. प्रजनेशने तिसरा व निर्णायक सेट जिंकत आगेकूच केली.

दुसरीकडे, पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्नाने कॅनडाच्या डेनिस शापोवालोव याच्यासह खेळताना स्कॉटलंडच्या जेमी मरे आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस यांना 6-4, 6-4 असे पराभूत करत दुसरी फेरी गाठली.

Check Also

लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता …

Leave a Reply