पनवेल : वार्ताहर
पनवेलमध्ये प्रथमच आई व मुले यांच्यात बॉक्स क्रिकेट स्पर्धा नुकतीच कॅप क्लब टर्फ ग्राऊंड स्पोर्ट्स अॅकॅडमी येथे रंगली. कॅप क्लब व किड फन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत आई व मुले अशा 10 जणांचा एक संघ असे आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.
या स्पर्धेत खेळवण्यात आलेल्या संघांमध्ये गुज्जु स्वॅग स्टार, फॅब्युलस फाइटर्स, घाटकोपर आयकॉन, रेड वॉरियर्स, चक दे इंडिया, टेरिफीक ऐवंजर, गो गेटर्स सुपर स्ट्रायकर्स या संघांचा समावेश होता. यात गुज्जु स्वॅग स्टार संघाने विजेतेपद पटकाविले. घाटकोपर आयकॉन संघ उपविजेता ठरला. असाच सर्वांना एकत्र आणणारा उपक्रम राबविण्याचा मानस आयोजकांनी या वेळी व्यक्त केला.