पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भाजप वाहतूक सेल आणि शिव वाहतूक संघटनेच्या वतीने मोफत जेवण, मास्क आणि हॅण्डवॉशचे गरीब, गरजूंना वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिव वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ताशेठ केंद्रे, तालुकाध्यक्ष आनंद गुरव, शहराध्यक्ष गोपाळ व्यवहारे, युवा कार्यकर्ता ईश्वर लालगे, राहुल वाहुळकर, अशोक आंबेकर आदी उपस्थित होते.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …